top of page

।। जयोस्तुते जयोस्तुते ।।

 

जयोस्तुते जयोस्तुते श्री महान्मंगले ! शिवास्पदे ! शुभदे !

स्वतंत्रते ! भगवती ! त्वांमहम यशोयुताम वंदे !

 

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू ! नीति संपदांची

स्वतंत्रते ! भगवती ! श्रीमती राज्ञी तूं त्यांची

परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी

स्वतंत्रते ! भगवती ! चांदणी चमचम लखलखशी ।।१।।

 

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली

स्वतंत्रते ! भगवती ! तूंचि ती विलसतसे लाली

तूं सूर्याचे तेच उदधीचे गांभीर्यही तूंचि

स्वतंत्रते ! भगवती ! अन्यथा ग्रहण नाश्ता ते ची ।।२।।

 

मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती

स्वतंत्रते ! भगवती ! योगिजन परब्रह्म वदती

जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें

स्वतंत्रते ! भगवती ! सर्व तव सहचारी होते ।।३।।

 

हे अधमरक्तरंजिते ! सुजनपूजिते !

श्री स्वतंत्रते ! श्री स्वतंत्रते !! श्री स्वतंत्रते !!!

तुजसाठी मरण ते जनन, मरण ते जनन !

तुजविण  जनन ते मरण,  ते जनन ते मरण !

तुज सकल चराचर शरण ! चराचर शरण !

श्री स्वतंत्रते ! श्री स्वतंत्रते !! श्री स्वतंत्रते !!!

स्वतंत्रते ! भगवती ! त्वामहंम यशोयुतांम वंदे ।।४।।

bottom of page